मराठी कथा, लेख

मंगळवार, १५ जून, २०२१

आरंभ



A well beginning is half done

म्हणजे सुरुवात चांगली झाली तर अर्धे काम झाले असे म्हणतात.
सुरुवात चांगली व्हावी आणि आपले कार्य निर्विघ्नपणे व्हावे यासाठी   
श्री गणेशाचे नाव घेतात,श्रीफळ फोडतात ,पेढे,मिठाई वाटतात.
कोणतेही मोठे कार्य करायचे असेल ,आपली ध्येय पूर्ण करायची असतील तर अगोदर काहीतरी सुरुवात  करावी लागते.आपल्या डोक्यातील कल्पना, विचार यांना कृतीत आणणे गरजेचे असते.पैसा कमविण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय करावे लागते.नोकरीसाठी आपले शिक्षण,ज्ञान कामात येते.सुरुवातीला कामाचा अनुभव नसतो पण हळूहळू सर्व जमायला लागते पण त्यासाठी सुरुवात होणे महत्त्वाचे. व्यवसायात देखील सुरुवातीला हवी तेवढी मिळकत होत नाही ,पण आपल्या व्यवसाय कौशल्याने प्रगती करू शकतो.म्हणजेचं आपले करियर घडवायचे असेल तर त्यासाठी योग्य दिशेने सुरुवात करावी लागते.
आपल्याला ज्या गोष्टींची आवड असते,जसे संगीत, गायन,वादन,नृत्य,चित्रकला, लेखन,वाचन,खेळ,विविध कला इ.इ. जे केल्याने आपल्याला वेगळाचं आनंद मिळतो .सुरुवातीला फक्त छंद म्हणून पाहिले तरी काही जण यात आपले करियर करतात.   अशा विविध क्षेत्रात  अनेकांनी आपली नावे अजरामर केली आहेत ,संबंधित क्षेत्रात चांगली सुरुवात करून परिश्रमाने, सरावाने त्यांना यश मिळाले. तर  काही जण आपली नोकरी,व्यवसाय सांभाळून असे छंद जोपासतात फक्त आवड म्हणून.
नवीन वर्षात आपण चांगल्या गोष्टींची सुरुवात करु असे अनेक लोक संकल्प करतात. व्यसनी लोक व्यसनमुक्ती चा ,health conscious लोक नियमित व्यायाम करण्याचा ,विद्यार्थी अभ्यासाचा इ. असे अनेक जण अनेक संकल्प ठरवितात. सुरुवातीचे काही दिवस,काही महिने संकल्प केल्यानुसार वागतात, नंतर सर्व विसरून जातात. सुरुवात केली तर पुढे continuity पण हवी ना ?
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी अनेक स्वप्ने, ध्येय असतात जी पूर्ण व्हावी असे त्या व्यक्तीला वाटत असते आणि पूर्ण करण्यासाठी धडपड ही सुरु असते.आणि मगं त्या दिशेने सुरुवात ही करतात.काही वेळेस सुरुवातीला सोपे वाटणारे काम नंतर अडचणी येत गेल्यावर अवघड वाटायला लागते मगं अनेक जण ते काम अर्धवट सोडतात.तर काही वेळेस सुरुवातीला अवघड वाटणारे काम सरावामुळे जमायला लागते आणि कामाची आवड निर्माण झाल्याने कामे पूर्णत्वास जातात.
सामाजिक क्षेत्रात अनेक समाज सुधारकांनी चांगल्या गोष्टींची सुरुवात केली म्हणून आज त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत .महात्मा फुले ,सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली,त्यामुळे चं आज मुली सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहेत.विधवा विवाह मान्यता,हुंडाबंदी  सतीबंदी,बालविवाह बंदी,
अशा अनेक सुधारणांची सुरुवात झाली. त्यामुळे स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार कमी होण्यास मदत झाली.
आजही समाजात खुप साऱ्या समस्या आहेत.गरीबी,अज्ञान,
अत्याचार, रोगराई, निरक्षरता,पर्यावरणाचा असमतोल इ.अनेक व्यक्ती ,अनेक संस्था या अशा समस्यांवर कार्य करीत आहे .त्यांनी सुरुवात तर केली आणि यश ही मिळत आहे. काही लोक फक्त चर्चा करीत असतात पण कृती मात्र करीत नाही. नुसते बोलण्यापेक्षा कृतीद्वारे सुरुवात करणे महत्त्वाचे!
प्रत्येक समस्येवर काही तरी उपाय असतो आणि तो कृती करून करावा लागतो.उदा.पर्यावरणाची समस्या .मगं यासाठी प्रत्येकाने स्वतः पासून सुरुवात करावी. म्हणजे काय?तर झाडे लावावी,त्यांची काळजी घ्यावी,प्लास्टिकचा वापर टाळावा,कचरा व्यवस्थापन नीट करावे इ.
असे प्रत्येकाने केले तर पर्यावरण चांगले राहील आणि आपले आरोग्य ही !
आपण स्वतः पासून सुरुवात केली म्हणजे अगोदर कृती केली आणि नंतर इतरांना समजावून सांगितले तर त्याचा परिणाम निश्चितच चांगला होईल.

1 टिप्पणी:

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...