मराठी कथा, लेख

शनिवार, १० जुलै, २०२१

Blog लेखन.....



मला लहानपणापासून वाचनाची आवड होती.अभ्यास ही करायला आवडत असे.अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तके चांदोबा, इसापनीती ,गोष्टींची पुस्तके इ.वाचत असे.वाचलेल्या चांगल्या गोष्टीं लक्षात ठेवत असे.हे सर्व वाचताना  मला खुप आनंद होत असे.वाचन हा माझा आवडता छंद च झाला.
कथा,कादंबऱ्या,आत्मचरित्र, माहितीपर पुस्तके असे सर्व वाचू लागले.दिवसेंदिवस वाचनाची भुक वाढत गेली. कधी आनंद तर कधी माहिती साठी,ज्ञानासाठी वाचन सुरू राहिले.
  वाचन सुरू असल्याने शब्दसंपत्ती वाढली ,विचार मांडता येऊ लागले.मनातले कागदावर उतरण्यास मदत झाली .मनात आलेले विचार शब्द रुपात लिहू लागली .चारोळी, कविता लिहिण्यास जमू लागले.
 मी खुप मोठी लेखिका किंवा कवयित्री नाही .
पण लिखाणातून मी माझ्या भावना व्यक्त करत राहिले आणि इतरांना ते आवडू लागले.चांगल्या प्रतिक्रिया मिळत गेल्या.त्यामुळे माझा लिखाण करण्यास आत्मविश्वास वाढला.आपण लिहीलेले इतरांना आवडते,त्यांना वाचून आनंद होतो आणि यामुळे मी आनंदी होते.
 
" दिसा माजी काही तरी ते लिहावे । प्रसंगी अखंडीत वाचीत जावे।।

याप्रमाणे वाचन तर अखंडीत सुरू चं आहे पण आपल्या ज्ञानानुसार काही तरी लिहीणे पण सुरू आहे.आपण लिहीलेले इतरांना ही वाचावे असे वाटू लागले.
खुप जणांना वाचनाची आवड असते.पुस्तके विकत घेऊन , लायब्ररी चे सभासद होऊन वाचन करतात.आता तर pdf स्वरूपात पुस्तके वाचायला मिळतात. Social media वर साहित्य संबंधित apps,groups असतात त्याद्वारे आपण इतरांचे लिखाण वाचू शकतो आणि आपण ही आपले लिखाण share करू शकतो.
माझे लिखाण वाचून मला माझ्या मैत्रीणीने blogs लिहीण्यास सांगितले. अगोदर मी इतरांचे blogs वाचण्यास सुरुवात केली.Blog writing  काय असते ? कसे लिहायचे? हे सर्व जाणून घेतले.मगं आपणही blog लिहू शकतो हे ठरविले.
'माझा छंद' या नावाने blog तयार केला .त्यात चारोळ्या,कविता, लेख इ. लिहायला सुरुवात केली.

" जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांसी शिकवावे । शहाणे करून सोडावे सकल जन ।।"

आपल्याला जे माहिती असते,कळते,समजते ते आपल्या परीने ,आपल्या शब्दांत लिहीते आहे .
जसा वाचन करतांना आनंद होतो तितकाचं आनंद लिहीतांना होत आहे.आपण छान छान लिहावे आणि ते वाचतांना इतरांनी आनंदी होणे असे वाटते. 
माझे blogs इतरांनी वाचावे म्हणून मी माझे friends ,नातेवाईक ,ओळखीतील व्यक्ती यांना सांगितले. काहींना आवडले ,काहींनी छान प्रतिक्रिया दिल्या ,काहींनी suggestions दिले.त्याप्रमाणे बदल करत मी लिहीते आहे.
Blog लेखन करून मी वाचनाबरोबर लेखनाचा ही आनंद घेत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...