मराठी कथा, लेख

शनिवार, २० ऑगस्ट, २०२२

श्रीकृष्णा

 


कृष्ण ज्याचं नाव

गोकूळ ज्याचं धाम

 त्या नटखट श्रीकृष्णाला

माझा शतशः प्रणाम।।



श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यामुळे त्या अष्टमीला कृष्णजन्म साजरा होतो.


या दिवसाला 'कृष्णाजन्माष्टमी' किंवा 'गोकुळाष्टमी' असे म्हणतात.


कृष्णाला जन्म देणारी त्याची आई देवकी होती. पण आपला भाऊ कंस ,याच्यापासून बाळाचे रक्षण करण्यासाठी बाळकृष्णाला वसुदेवाने गोकुळातील आपला मित्र नंद याच्या स्वाधीन केले. 

नंदचा पत्नी यशोदा हीच छोट्या कृष्णाची आई झाली.

म्हणूनचं,

'देवकीका नंदलाला यशोदाने पाला...'

असे म्हटले जाते.


यशोदा ही कृष्णाची खरी आई नव्हती. तरी तिने कृष्णाला सख्या आईपेक्षा ही जास्त प्रेम केले.आणि म्हणूनचं श्रीकृष्णाचे नाव येताच यशोदा माता आठवते.


आजही समाजात अनेक ठिकाणी मुलांना आपल्या जन्मदात्या आईचे प्रेम मिळत नाही. दुर्दैवाने त्यांच्या आईचा मृत्यू होतो किंवा मुलांना काही काही कारणास्तव अनाथाश्रमात सोडले जाते. तेव्हा त्या मुलांना सांभाळणारी व्यक्ती म्हणजे त्यांच्या साठी यशोदामाताचं!


कृष्णाला अनेक वस्तू आवडायच्या. त्यातील दही व लोणी हे सर्वांत प्रिय.ते इतके प्रिय होते की त्यासाठी त्याची चोरी ही करायचे.

श्रीकृष्ण स्वतःच्या घरातून,मित्रांच्या घरातून ,शेजारच्या घरातून किंवा गावातील इतर घरांतून मित्रांसह दही,लोणी चोरून आणत आणि खाण्याचा आनंद घेत आणि मित्रांनाही देत.

त्यामुळे श्रीकृष्णाला 'नवनीत चोर' ,'माखणचोर' म्हटले जाते.


कृष्णाजन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव आजही आनंदात  साजरा केला जातो.बालगोपाळ ,

गोविंदा हे सर्व दहीहंडीचा आनंद घेतात.


श्रीकृष्णाने लहानपणी अनेक बाललीला केल्या. सवंगड्यासह दही,लोणी चोरले.यशोदामातेचा मारही खाल्ला. पण त्यांच्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी  चांगले कारणही  होते. 


कृष्ण म्हटले म्हणजे राधा आलीचं. राधेशिवाय कृष्ण अपूर्णच.. म्हणून तर 'राधाकृष्ण'  हे नाव जोडीने म्हटले जाते.

राधा ही श्रीकृष्णाची परमप्रिया,प्रियसी,सखी आणि एक खरी निस्सिम भक्त होती.राधेचे कृष्णावर मनापासून प्रेम होते.कृष्ण लहाणपणी इतर गोपिकांप्रमाणे राधा बरोबर ही खेळ खेळत असे. 


आजही श्रीकृष्णाला आपला सखा समजणाऱ्या अनेक राधा आहेत. ज्या कृष्णावर राधेसारखे प्रेम करतात. 


श्रीकृष्णाला अनेक गोष्टी आवडत होत्या. त्यातील अत्यंत आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या मुकुटावर कायम असलेले मोरपीस.


मोरपीसात अनेक रंग असतात. हे रंग जीवनाच्या परिस्थितीचे प्रतिनिधित्व करतात. आयुष्यात सुख आणि दुःख अशा दोन्ही परिस्थितीत आपण समान राहिले पाहिजे. जीवनातील सर्व रंगांचा आनंद घेतला पाहिजे.


देवकीच्या पोटी जन्मलेल्या श्रीकृष्णाने *यशोदा* नंदन , होऊन *गोकुळात* आपल्या मित्रांसोबत बाललीलांचा आनंद घेतला. *दही* ,*लोणी* चोरून खाल्ले आणि मित्रांनाही खाऊ घातले. 

*राधा* सारख्या प्रिय सखीचे प्रेम मिळाले.आणि *मोरपिसातील* विविध रंगांप्रमाणे आपल्या आयुष्यातही वेगवेगळे रंग भरले.

आणि सर्वांसाठी सुखी,आनंदी जीवनाचा एक आदर्श  ठेवला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...