मराठी कथा, लेख

सोमवार, १६ जून, २०२५

वडील

 आपल्या मुलांवर असते

आईची खूप खूप माया

आणि वडिल देतात सदैव

 सुखाची व आनंदाची छाया

आईचे कोवळे, नाजूक मन

अश्रूतून, स्पर्शातून दिसून येते

पण वडिलांचे मन काय असते? 

हे मुलांना वडील झाल्यावर कळते

मुली व वडिलांचे नातेच वेगळे राहते

भाग्य म्हणावे वडिलांचे ज्यांना मुलगी असते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...