जेष्ठ पौर्णिमा म्हणजे 'वटपौर्णिमा' .
या दिवशी सौभाग्य स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात.
सावित्री ने आपले पती सत्यवान यांचे यमाकडून प्राण मागवून घेतले.अंध सासू सासऱ्यांचे डोळे मागितले.ज्या दिवशी सत्यवानाचे प्राण परत आले तो दिवस जेष्ठ पौर्णिमेचा होता आणि ज्या झाडाखाली ते जिंवत झाले ते वडाचे झाड होते.म्हणून त्या दिवसापासून या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा होत आहे.
आध्यात्माबरोबर शास्त्रीय दृष्ट्या ही सणाचे महत्त्व आहे.वडाचे झाड दीर्घायुषी असते।ऑक्सिजन जास्त प्रमाणात देणारे झाड आहे.वडाच्या सानिध्यात आल्याने शुद्ध हवा मिळते.लोकांना झाडांचे महत्त्व समजावे हा ही हेतू असतो.
स्त्रिया या दिवशी उपवास करतात. छान छान साडी,दागिने घालून तयार होतात.वडाची मनोभावे पूजा करतात आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळू दे,संसार सुखाचा होऊ दे ,अशी प्रार्थना करतात.
' सावित्री ब्रम्ह सावित्री सर्वदा प्रियभाषिणी।
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार- सागरात्।
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते।
अतियोगो तथास्माक भूयात् जन्मानि जन्मति।।'
'जन्मोजन्मी हा चं पती मिळू दे ' अशी प्रार्थना करतात. सौभाग्यवतींना वाण देतात.
सावित्री ही पतिव्रता स्त्री होती यामुळे तिच्या प्रार्थनेने यमाने सत्यवानाचे प्राण परत दिले.आज ही अनेक स्त्रिया आपल्या पतीवर जीवापाड प्रेम करतात, सासू सासऱ्यांची सेवा करतात, संसार सुखाचा राहण्यासाठी झटत असतात. पण काही ठिकाणी स्त्रियांवर अन्याय, अत्याचार होत असतात. अनेक मार्गाने त्यांचा छळ होत असतो.स्त्रीचे रक्षण करण्याचे काम तिच्या पतीचे असते तरी तो तिचा शत्रू बनतो.प्रत्येक स्त्री ही सावित्री सारखी पतिव्रता असावी असे सांगितले जाते मग पती ही सत्यवानासारखा का असू नये?स्त्री ही नेहमी सोशिक चं का असावी ?इतरांसाठी तिने आपल्या सुखांची का तिलांजली द्यावी?
स्त्रीला काही मर्यादा असतात पण रीती,पद्धती, संस्कार, संस्कृती, वगैरे या गोष्टी सांगून तिचे विचार का दाबले जातात? तिला स्वातंत्र्य का नाही? बंधनात तिचे पावित्र्य असते मग बंधनाच्या नावाखाली तिची पिळवणूक, शोषण होते त्याचे काय ?
जशी स्त्री ला बंधने असतात तशी पुरुषाला का नाही? व्यसने, व्यभिचार अशा गोष्टी पुरुषांना का मान्य?
आता स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करीत आहे.अनेक गोष्टींचे स्वातंत्र्य ही मिळत आहे पण स्रियांनी ही आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा,स्वातंत्र्याचा गैरवापर करु नये.आपण लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, सावित्री यांचे रूप आहोत हे विसरु नये.
सण हे यासाठी चं असतात की,प्रत्येक नात्याची जाणीव व्हावी, नात्यानात्यात आदर,प्रेम निर्माण व्हावे,नात्यांमधील आदर वाढावा. आनंदाबरोबर पर्यावरण, संस्कृती ही सांभाळली जावी.संस्कार हे पिढयानपिढ्या पुढे जात राहवे.आणि आपल्या जीवनात आनंद,उल्हास टिकून रहावा.
म्हणून सण साजरे करत असतात.
प्रत्येक स्त्रीने सावित्रीसारखे राहणे आणि प्रत्येक पुरुषाने ही सत्यवानासारखे राहणे म्हणजे संसार सुखाचा ....
आणि पर्यावरण रक्षणासाठी एक तरी झाड जरूर लावू या...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.