मराठी कथा, लेख

Breaking

रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

कुंकू ( भाग 2 )

 

गौरीला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आजी आपल्या पद्धतीने सांगायची,

" बेटा, आत्याचे लग्न झाले त्या दिवशी ती सौभाग्यवती झाली. तिच्या कपाळावरील कुंकवाचं नातं हे तिच्या नवऱ्याशी जोडलं गेलं. प्रत्येक सौभाग्यबाई आपल्या नवऱ्याच्या नावाने , आपल्या कपाळावर कुंकू लावते..आता टिकल्या लावतात. जोपर्यंत नवरा जिंवत असतो तोपर्यंत,कपाळावरच्या कुंकूला,टिकलीला महत्त्व असते.आत्याचा नवरा जरी त्रास देत असला तरी तो जिंवत आहे आणि बायको या नात्याने आत्या त्याच्या नावाचे कुंकू लावते. हीच आपली संस्कृती आहे. "


बिचाऱ्या गौरीला तर यातलं फार थोडसचं कळतं होतं.


गौरी जशी मोठी होऊ लागली, तशा अनेक गोष्टी तिला समजायला लागल्या,ती समजून घेण्याचा प्रयत्न करू लागली.


आपल्या भारतीय संस्कृतीचे,परंपरांचे,

संस्कारांचे महत्त्व तिला समजू लागले.

राहणीमान, कपडेलत्ते, दागदागिने या सर्व गोष्टींमुळे व्यक्तीचे सौंदर्य तर वाढतेच पण त्यामागे शास्त्रीय कारण सुद्धा असते. 

या सर्व गोष्टींचा विचार करूनचं आपली भारतीय संस्कृती बनवली गेली आहे. 

आपली भारतीय जीवनशैली, अगदी खाणपानापासून ते राहणीमानापर्यंत इतकी छान बनवली आहे की, प्रत्येक ऋतूनुसार खाणेपिणे, कपडे आणि सणसमारंभ सुद्धा साजरे केले जातात. प्रत्येक सण हा प्रत्येक नात्याशी निगडित असतोच पण फक्त नात्यांपुरताच नाही तर झाडे,पक्षी ,प्राणिमात्रांचा ही विचार करून सण साजरे केले जातात.


आपली भारतीय संस्कृती ही आपल्याला , आपल्या स्वतःवर तर प्रेम करायला शिकवतेचं पण आपल्याबरोबर इतरांवरही प्रेम करायला शिकवते.प्रत्येक नाते जीवापाड जपणारी संस्कृती म्हणजेच ...आपली भारतीय संस्कृती!


परिवर्तन काळाची गरज आहे.भारतातही प्रगतीचे वारे वाहत आहे आणि ती गरजही आहे.पण पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करता करता आपल्या महान अशा संस्कृतीला विसरू नये.असे गौरीच्या लक्षात यायला लागले.

भारतीय लोक हे बुद्धिपेक्षा मनाने एकमेकांशी जोडले जातात. त्यामुळेच तर भारतीय स्त्रिया आपल्या कपाळावरील कुंकवाच्या रूपात नवऱ्याच्या सुखी आयुष्याची प्रार्थना करीत असतात. 


आजकालच्या फॅशनच्या युगात, कोणी फॅशन म्हणून टिकली लावत असतील तर कोणी ओल्ड फॅशन म्हणून लावतही नसतील. व्यक्तिस्वातंत्र्यामुळे,कोणी काय करायचे आणि कोणी काय करायचे नाही... हा ज्याचा त्याचा प्रश्न ठरतो.


आपल्याला जे आवडतं,आपल्या मनाला जे पटतं.. तेचं आपण करावं...


गौरीही आता लग्नाची झाली होती.गौरीला अनुरूप नवरा मुलगा शोधला गेला.लग्नाचा दिवस उजाडला. सर्व कार्यक्रम छान पार पडत होते. आणि ती वेळ आली .. जेव्हा गौरीच्या नवऱ्याने , तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले व तिच्या भांगेत कुंकू लावले..त्या क्षणी गौरीला एक वेगळीचं जाणीव झाली. तिला नवऱ्याबद्द्लचे तिचे प्रेम अधिकचं घट्ट झाल्यासारखे वाटले .. आणि तिला आपल्या आजीच्या कुंकवाची आठवण येताचं डोळ्यात पाणी आले.

आज गौरीने अंगावर घातलेल्या महागड्या, मौल्यवान दागिण्यांपेक्षाही,गौरीला  तो भांगेतला कुंकू लाखमोलाचा वाटू लागला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

आईचा त्याग

 "आई, आई, तुझा जय आला बघं. आता  तू लवकर बरी होशील  आणि तू बोलत का नाहीयेस?  आई, बोल ना माझ्याशी..."  जय आपल्या आईशी बोलत होता.  ...