मराठी कथा, लेख

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

माझा आवडता अभिनेता


लहानपणी दूरदर्शनवर आठवड्यातून फक्त शनिवारी व रविवारी चित्रपट येत असे. मराठी चित्रपटात लक्ष्या व अशोक सराफ यांची कॉमेडी आवडत होती. त्यांचे चित्रपट पाहून खूप हसायचे.

हिंदी चित्रपट बघताना जर राजेश खन्नाचा असेल तर आईबरोबर मी ही खूश व्हायची कारण आईचा आवडता अभिनेता राजेश खन्ना होता. आणि बाबांचा आवडता अमिताभ बच्चन त्यामुळे जेव्हा अमिताभचा  चित्रपट असायचा तेव्हा बाबा खूश व्हायचे आणि मी पण. 

हा अभिनेता किंवा ही अभिनेत्री लोकांना का आवडते ? हे तेव्हा लहानपणी काही समजत नव्हते. फक्त चित्रपट पाहून खूश होणारे ते वय होते. 

थोडे मोठे झाल्यावर कळले की, भावाला अनिल कपूर आवडतो. मगं भावाबरोबर मी पण अनिल कपूरचे चित्रपट पाहू लागली. 


 जो सुंदर दिसतो, व जो गुंडाशी फायटिंग करतो त्यालाच हिरो / अभिनेता म्हणून चित्रपटात घेतात. असे वाटायचे. 

चित्रपटात दाखवतात हे सगळे खरेचं असते. असे तेव्हा वाटायचे.

आपण यांना कधी भेटू शकू का ? हे सर्व आपल्यासारखेच असतात की आपल्या पेक्षा वेगळे असतात?  असे अनेक प्रश्न  मनात यायचे.

या प्रश्नांसोबतचं मोठी होत गेली. 

आणि मगं चित्रपटगृहात 'हम आपके है कौन ' चित्रपट पाहिला.

त्यातील गाणी खूप आवडली. माधुरीचा व सलमानचा रोमान्स खूप आवडला.आणि मगं काय ..सलमान  आवडू लागला. अभ्यासाबरोबर  मैत्रीणींसोबत इतर गप्पा गोष्टी करता करता कळले की, बऱ्याच मैत्रीणींचा आवडता हिरो सलमान आहे. कोणाला त्याचे देखणेरूप  आवडायचे , कोणाला ऍक्टिंग तर कोणाला त्याचा  हिरोईन सोबतचा रोमान्स . कोणी त्याचे वर्तमानपत्रातील ,मासिकातील  वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटोचे कटिंग जमा केले. काहींनी त्याचे छानसे पोस्टर घरातील भिंतीवर लावले.यासाठी घरातील लोकांची बोलणी पण ऐकायला मिळाली. 

दिल तो पागल है, DDLJ ,कुछ कुछ होता है  हे चित्रपट पाहिले आणि शाहरुख मला आवडायला लागला. 

अक्षयचा धडकन पाहून तोही आवडू लागला. 

मगं मला कळाले की, माझा आवडता अभिनेता यासाठी कोणा एकाची निवड करणे शक्यचं नाही. 

सर्वच हिरो व हिरोईन दिसायला छानचं ! ऍक्टिंगही छानचं करतात. 

जेव्हा मी वेगवेगळ्या हिरोंचे  चित्रपट बघितले, तेव्हा चित्रपटाबरोबर  त्यातील त्या हिरोचे कामही आवडत गेले. 

जसे नायक मधील अनिल कपूर. 

आणि जेव्हा आपल्या आवडत्या हिरोच्या खऱ्या आयुष्यातील वाईट  गोष्टींबद्दल कळायला लागते ,तेव्हा साहजिकच आवडता हा  नावडता होऊ लागतो. 

 जेव्हा ते एवढे मोठे सेलिब्रिटी बनतात, त्यांचे जे चाहते असतात, ते त्यांचे अनुकरण करू लागतात. त्यामुळे त्यांनी चित्रपटातील हिरोइतका नाही पण थोडा  फार तरी चांगला आदर्श आपल्या चाहत्यांना द्यायला हवा. 

काही हिरो खरचं असे असतात की, वास्तव जीवनात ही  ते हिरोप्रमाणे चांगले काम करत असतात. 

चित्रपटातील हे सर्व हिरो आपल्याला कितीही आवडत असले,आपण त्यांच्यावर कितीही प्रेम करत असलो तरी, आपल्या आयुष्यात आपल्यावर प्रेम करणारे ,आपल्याला संकटात मदत करणारे आपले वडील, आपले भाऊ ,आपला जीवनाचा सोबती आणि जगात फक्त माझीचं मुले सुंदर असे प्रत्येक आईला वाटते...ती  आपली मुले हेचं आपल्या आयुष्यातील खरे व आवडती  हिरो आहेत.


समाप्त

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...