मराठी कथा, लेख

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३

Valentine Day

 


Valentine day प्रेम व्यक्त करण्याचा दिवस 

मनातल्या भावनांना शब्द रूप देण्याचा दिवस 


Valentine day च्या निमित्ताने  प्रेयसीने आपल्या प्रियकराला लिहीलेल्या चारोळ्या...


1) 


 एकमेकांच्या भावनांमध्ये

गुंतून गेलो हे जाणवले नाही

 भांडण,राग व रूसणे यातही 

प्रेम असते हे ही कळले नाही


2)


मला जे वाटत होतं

तेचं तुलाही वाटत असावं

पण आपल्या दोघांनाही ते 

ओठांवर आणायचं नसावं


3) 


तुझं हसणं,बोलणं

मनाला भारावून जातं

आणि तू जवळ नसल्यावर

मन तुझ्या आठवणीत रमतं


4)

तुला भेटण्याची मनाला

नेहमीच ओढ असते

आणि तुला भेटल्यावर 

मी स्वतःलाचं विसरते


5)


तुझ्याविषयी मला असं

वेगळं काय वाटतं

हे स्वतः ला विचारायला 

माझं मनही बावरतं


6)


तुझी आठवण येताच

कंठ दाटून येतो

क्षणभर, तू येण्याचाचं

मला भास होतो


7)


प्रेम काय असतं

हे तुझ्यामुळे कळलं

भाग्यवान समजते स्वतः ला

तुझं प्रेम जे मला मिळालं


8)


तुझ्यामुळे , तुझ्या प्रेमामुळे

मी सदैव राहते happy

फक्त  एकचं दिवस का ?

रोजचं असावा valentine day




नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...