मराठी कथा, लेख

बुधवार, २० डिसेंबर, २०२३

स्वप्नपूर्ती

 

"बाबा,मला अजून शिकायचं आहे,मला एवढ्यात लग्न नाही करायचं." सुनिता आपल्या बाबांना विनवणी करत सांगत होती.

पण तिच्या विनवणीचा तिच्या बाबांवर काहीही फरक पडत नव्हता. 

सुनिताला शिक्षणाची खूप आवड होती आणि ती हुशार व  अभ्यासूही होती. उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदाची नोकरी करायची.हे स्वप्न ती उराशी बाळगून होती; पण बाबांच्या या निर्णयामुळे तिचे स्वप्न ..हे फक्त स्वप्न म्हणूनचं राहणार होते.

'घरबसल्या चांगल स्थळ आलचं आहे;आणि शिक्षण करूनही संसारच करायचा आहे ना!'

अशा विचाराने सुनिताचे  बाबा तिचे न ऐकता लग्नाच्या तयारीला लागले.

कितीही रडले, कितीही मनाला त्रास करून घेतला तरी बाबांचा निर्णय काही बदलणार नाही, हे सुनिताला कळून चुकले आणि म्हणून ती लग्नाला तयार झाली. 


सुनिताची सासरची आर्थिक परिस्थिती खूप चांगलीही नाही आणि खूप वाईटही नव्हती.सासरे शेती करायचे. सुनिताचा नवरा एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. नंदेचे लग्न झालेले होते व दीराचे शिक्षण सुरू होते. शेतीचे उत्पन्न आणि नवऱ्याचा पगार यावर सर्व सुरू होते.नंदेच्या लग्नासाठी कर्ज(loan) काढलेले होते. ते फेडणेही सुरू होते. ते कर्ज(loan)  संपत नाही;तोपर्यंत दीराच्या  नोकरीसाठी पैसे भरण्याकरीता कर्ज काढावे लागले.

दीराला बाहेरगावी नोकरी मिळाली. नोकरीनंतर पुन्हा त्यांच्या लग्नाचा खर्च..सुनिताचाही संसार वाढत होता.

प्राची आणि तीन वर्षांनी प्रणवचा जन्म झाला. 

आता त्यांच्याही शिक्षण व इतर खर्चाची जबाबदारी वाढली होती. 


सुनिता शांतपणे बसून राहणाऱ्यापैंकी नव्हती. शाळेसमोरच त्यांचे घर असल्याने,तिने स्टेशनरी आणि  चॉकलेट्स, बिस्किटे असे खाण्याचे सामान विक्रीसाठी ठेवू लागली. सामानाची चांगली विक्री होऊ लागली.तिने लग्नाअगोदर ब्युटीपार्लरचा कोर्स केलेला होता त्यामुळे तिने पार्लरचेही काम सुरू केले.तिची ही सर्व धावपळ पाहून तिच्या सासूबाईंना वाटले, 'आपल्या मुलाच्या संसारासाठी तर ही सर्व करत आहे.' या विचाराने का असेना पण त्या तिला घरकामात मदत करू लागल्या.तिलाही तेवढाच आधार! 

सुदैवाने तिची दोन्ही मुले अभ्यासू,हुशार होती. त्यांना मिळालेले यश पाहून ती आपल्या कामाचा थकवा विसरून जायची आणि मुलांसाठी अजून काही चांगले करण्याची तिला ऊर्जाही  मिळायची.ती मुलांच्या भविष्यासाठी पैशांची बचत(saving)ही  करायची. 

संसाराच्या जबाबदाऱ्या पूर्ण सांभाळत सांभाळत वर्षामागून वर्षे निघून गेली.मुलेही मोठी झाली.

प्राचीने बारावी सायन्स नंतर बी.एस्सी. (Statistics) ला ऍडमिशन घेतले. प्रणव नववीत होता. 

मध्यंतरी सासऱ्यांना कॅन्सर झाला. त्यांच्या उपचारासाठी पैसा खर्च झाला. पण तरीही ते वाचले नाहीत..सासूबाईंचेही  अधूनमधून छोटे मोठे ऑपरेशन सुरू होते.दीरही काहीना काही कारणे सांगून कमी पैसे द्यायचा.त्यामुळे घरात आर्थिक अडचण आली की, सुनिताला तिची केलेली बचत खर्च करावी लागायची. शेतीच्या उत्पन्नात काही परवडत नव्हते. नवऱ्याचा पगार आणि तिची मिळकत यातून सर्व खर्च होत होता. घरात कितीही समस्या येत असल्या तरी ती व तिचा नवरा  मुलांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करायचे.छोट्या छोट्या गोष्टीतून मुलांना सुख द्यायचे. आईवडील आपल्या आनंदासाठी किती प्रयत्न करत आहेत,हे मुलांना कळत होते. मुले ही चांगला अभ्यास करून,चांगल्या गुणांनी पास होत होते.प्रणवने 10 वी. नंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेतले आणि प्राचीने बी.एस्सी. (statistics) नंतर Data Analytics करण्याचे ठरवले.

आणि याबद्दल आई,बाबांशी बोलली

"आई,बाबा मला  Data Analytics PG Course करायचा आहे, यासाठी पुण्याला जावे लागेल,कॉलेज  फी व इतर खर्चही खूप असेल."


प्राचीने सर्व माहिती काढून अंदाजे किती खर्च येऊ शकतो ते आईबाबांना सांगितले.

एवढा खर्च  तर आपण नाही करू शकत पण प्राचीला तर तिचे स्वप्न पूर्ण करू द्यायचे. या विचाराने त्यांनी शैक्षणिक कर्ज(Education loan) घेण्याचे ठरवले.आणि त्यासाठी विचारपूस सुरू केली.

सुनिताच्या एका नातेवाईकाने शैक्षणिक कर्जाविषयी(Education loan) माहिती सांगितली.


शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी घेतलेल्या कर्जाला शैक्षणिक कर्ज(Education loan) म्हणतात. बारावीनंतरच्या पदवी(graduation)किंवा पदव्युत्तर(post graduation) तसेच उच्च शिक्षणासाठी (higher education) बॅंकेतून कर्ज(loan) घेतले जाते.

शैक्षणिक कर्ज (education loan) सरकारी बँक(government bank) आणि खाजगी बँक(private bank) यातून मिळते.


शैक्षणिक कर्ज(education loan) दोन प्रकारचे असते.


1) देशांतर्गत शैक्षणिक कर्ज(Domestic Education Loan)


हे कर्ज घेतल्यानंतर विद्यार्थी देशाबाहेर शिक्षणासाठी जाऊ शकत नाही. यात व्याजदर(rate of interest) कमी असतो.प्रत्येक बँकेचा दर वेगवेगळा असतो.


2) विदेशी शैक्षणिक कर्ज(Abroad Education Loan)

 

विदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्यासांठी हे कर्ज दिले जाते. याचे व्याजदर(rate of interest) देशांतर्गत शैक्षणिक कर्जाच्या व्याजदरापेक्षा जास्त असतात.


शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी पात्रता(Eligibility)


कर्ज घेणारा विद्यार्थी भारतीय नागरिक असावा आणि त्याचे वय 18 - 35 या दरम्यान असावे.

विद्यार्थ्याने घेतलेले ऍडमिशन कन्फर्म असावे.

विद्यार्थ्याचे शिक्षण 12 वी.पूर्ण असावे आणि त्याची शैक्षणिक गुणवत्ता उत्तम असावी.



देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लाख पर्यंत आणि विदेशातील शिक्षणासाठी 25 लाख पर्यंत कर्ज मिळते.


शिक्षण सुरू असेपर्यंत आणि त्यानंतरही एक वर्षापर्यंत व्याज(interest) लागत नाही. आणि या कालावधीत कर्ज नाही फेडले तर , नंतर व्याज आकारले जाते.


ही सर्व माहिती ऐकून प्राचीच्या आईबाबांनी तिच्यासाठी शैक्षणिक कर्ज घेण्याचे ठरवले. लागणारे कागदपत्र(documents) जमा केले आणि एका सरकारी बँकेतून (goverment bank) मधून कर्ज(loan)घेतले. 


"प्राची बेटा, तुला काही सांगायची गरज नाही कारण तू खूप समजूतदार आहेस. पण तरीही आईवडील काळजीपोटी आपल्या मुलांना चांगलेच सांगत असतात. तू चांगला अभ्यास कर. तुझे स्वप्न पूर्ण झाले म्हणजे आमचेच स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे.आम्ही तुला मदत करायला नेहमी तयार आहोत."


 शिक्षणासाठी पुण्याला जाणाऱ्या प्राचीला तिचे आईवडील समजावून सांगत होते.


पुण्याला गेल्यावर प्राचीचे  कॉलेज,अभ्यास ,फ्रेंड्सबरोबर मौजमजा असे रूटीन सुरू झाले.एका स्वप्नपूर्तीच्या दिशेने तिची वाटचाल सुरू झाली. 


सुनिताचेही आपले रोजचे रूटीन सुरू होतेच.

'आपल्याला शिक्षणाची आवड होती पण बाबांनी लग्न लावून दिले आणि संसारात गुंतले. आपल्या मुलांनी तरी त्यांचे स्वप्न पूर्ण करावे.यातच आपले समाधान!' 

असा विचार करत ती आपले कष्टदायी आयुष्य सुखाने जगण्याचा प्रयत्न करत होती.


प्राची हुशारही होती आणि खूप अभ्यास करून तिने आपले दोन वर्षांचे शिक्षण पूर्ण केले. तिची  कॉलेजकडूनच एका चांगल्या कंपनीच्या कामासाठी(job)निवड झाली. सॅलरी पॅकेज पण चांगले मिळाले. 

प्राचीला तर खूप आनंद झाला.आणि सुनिताला तर आकाश ठेंगणे झाले होते. आपणच तिच्या जागी आहोत असे वाटायला लागले होते.जे स्वप्न तिने स्वतः साठी पाहिले होते ..आज तिच्या मुलीच्या रूपात पूर्ण झाले होते.

'आपली आर्थिक परिस्थिती नसतानाही आपण कर्ज काढून तिचे शिक्षण पूर्ण केले. आता एका वर्षाच्या आत त्या कर्जाची परतफेड करू म्हणजे व्याज सुरू होणार नाही. 

कर्ज वगैरे या गोष्टींचा आयुष्यात प्रत्यक्ष कधी संबंध आला नव्हता. कर्जाविषयी अनेक गोष्टी फक्त ऐकल्या होत्या. 

पण आता आलेल्या अनुभवातून वाटते की, जर चांगल्या कामासाठी आणि तेही आपल्या कुवतीनुसार कर्ज घेतले तर निश्चितच फायदेशीर ठरते.'

सुनिता असे सकारात्मक विचार मनात ठेवून, झालेल्या  स्वप्नपूर्तीचा मनापासून आनंद घेत होती.



समाप्त 


नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...