मराठी कथा, लेख

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

जीवन

 1)

पुस्तकातील ज्ञान

पुस्तक वाचल्यावर कळते

पुस्तकाबाहेरील ज्ञान  

अनुभवातून कळते

पुस्तकातील ज्ञानामुळे

मनुष्य ज्ञानी बनतो

पुस्तकाबाहेरील ज्ञानामुळे

जगण्याचा अर्थ कळतो


2)

कधी कटू शब्द रडवतात

तर कधी कौतुकाचे शब्द हसवतात

कधी कठोर शब्दांनीच नाती दुरावतात 

तर कधी प्रेमळ शब्दांनीच नाती घट्ट होतात

आयुष्यात शब्दच खूप काही शिकवतात

कळत नकळत आपले आयुष्य घडवतात 


3 )

आजच्या  स्वार्थी जगात सर्वत्र 

नात्यांची लिलावपत्रिका दिसत आहे

पैशाने भावभावनांचा लिलाव होतो आहे

पण खूप बोली लावूनही सुख मिळत नाही आहे


4)

आयुष्य  जगत  असताना

सुखदुःखाचे भोग भोगावे लागतात

उधार घेतलेल्या नशीबाचे 

हप्ते कर्माने फेडावेच लागतात

5)

इतरांच्या सुखाचा विचार  करून 

घेतलेला निर्णय आज चुकीचा ठरला

पण या स्वार्थी जगात कसे जगायचे

हा धडा नक्की शिकवून गेला

6)

आजच्या स्वार्थी जगात 

चेहऱ्याविना माणूस  शोधणे अवघड  आहे

कारण वेगवेगळ्या मुखवट्यांत

माणसाचा  खरा चेहरा हरवला आहे

7)

आयुष्याच्या प्रवासात  कधीतरी

चार रस्त्यांचा फाटा लागतो

विचारपूर्वक योग्य रस्ता निवडला 

तर पुढचा प्रवास  सुखकर होतो

8)

जगात सर्वत्रच दिसत असते 

मुखवट्यांची मेजवानी

प्रत्येक मुखवट्याची असते  

एक वेगळीच कहाणी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...