मराठी कथा, लेख

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

प्रेमाची परीक्षा ( अंतिम भाग )

 

"स्वाती,आर्याच्या वाढदिवसाला तू तन्वीला घेऊन जा. मी कामासाठी बाहेर जात आहे." स्वातीच्या मावशीने स्वातीला सांगितले.


आर्याचे घर मावशीच्या घराजवळच होते. आर्याच्या आईने वाढदिवसाला सर्वांनाच बोलावले होते.मावशीला काम होते म्हणून स्वाती तन्वीला घेऊन आर्याकडे गेली. वाढदिवसाला खूप जण आलेले होते. कोणी ओळखीचे आहेत का? हे स्वाती पाहतच होती, तेवढ्यात तिला तिथे स्वप्नील दिसला. एका क्षणासाठी तिला वाटले, भास झाला की काय? पण नाही.. तो भास नव्हता,तो खरंच तिथे आलेला होता.

'त्याची व आपली भेट होऊ नये यासाठी मी देवाला प्रार्थना करते आहे. आणि देव आमची भेट घडवून आणतो आहे.देवानेही आता माझी परीक्षा पाहण्याचे ठरवले आहे की काय?' स्वातीचे मन विचार करू लागले.तन्वीला तिथे  एकटीला सोडून घरी जाऊ शकत नव्हती त्यामुळे पार्टीत स्वातीला थांबावेच लागणार होते.

स्वप्नीलचा चेहरा तर आनंदाने झळकत होता. स्वातीशी बोलण्याचा प्रयत्नही सुरू होता आणि स्वाती त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होती.'स्वाती माझी क्लासमेट होती.' अशी त्याच्या आईशी स्वातीची ओळखही  त्याने करून दिली. 

स्वातीही त्यांच्याशी छानपणे  बोलली. बोलण्यातून कळाले की, आर्याची आई व त्या जीवलग मैत्रीणी आहेत आणि त्यांचे चांगले घरोब्याचे संबंध आहेत.


सर्वजण पार्टीचा छान आनंद घेत होते आणि स्वाती घरी केव्हा जाऊ?  याची वाट पाहत होती. 


'आपण ठरवतो काही आणि होते काहीचं! 


आपली भेट होऊ नये असे वाटते आणि आता मावशीच्या घराजवळ त्याच्या आईची मैत्रीण राहते म्हणजे त्याचे येणेजाणे होईलच!'

या विचारातच स्वाती पार्टी संपल्यानंतर तन्वीला घेऊन घरी आली.

स्वप्नील तर जाम खूश होता. आपल्या मनासारखे होते आहे .असाच विचार करत तो आईसोबत घरी गेला.त्याचा आनंदी चेहरा पाहून आईलाही  काहीतरी जाणवले.तो स्वतः हून सांगतो याची वाट पाहू नाही तर विचारू एखाद्या दिवशी त्याच्या मनातले..आईने मनात  ठरवले.



स्वप्नीलला कॉलेजला सुट्टी असली की तो गावी यायचा आणि कॉलेजला नक्की जायचा. स्वातीशी तेथे भेट व्हायची आणि आर्याच्या आईकडेही काही काम असले की तो मुद्दाम यायचा,नेमकी त्यावेळी स्वाती काही तरी कामासाठी घराबाहेर निघायची.त्यामुळे पुन्हा भेटीचा योग!


असेच तीन वर्षे सुरू होते. स्वातीचे बी.एस्सी.ही पूर्ण झाले होते पुढे बी.एड. करण्यासाठी दुसऱ्या शहरात तिला जावे लागणार होते.


'बरे होईल म्हणजे स्वप्नीलची व आपली भेट तर होणार नाही ! 'असे स्वातीला वाटले.

आणि खरंच स्वातीच्या मनासारखे झाले. एका वर्षात स्वप्नीलची व तिची भेट झालीच नाही. 


स्वप्नीलचेही इंजिनिअरिंग पूर्ण झाले होते. 'आपण आताच काही केले नाही तर आपल्याला आपले प्रेम कधीच मिळणार नाही. स्वातीच्या घरातल्यांनी तिचे लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरवले तर ..आपण काही करू शकणार नाही.' हा विचार स्वप्नीलच्या मनात आला.त्याने आईबाबांना आपल्या प्रेमाविषयी सांगितले. एक प्रयत्न म्हणून आपण स्वातीच्या मावशीच्या घरी जाऊ या. असे सांगितले. 


स्वप्नील, त्याचे बाबा व आर्याचे बाबा हे स्वातीच्या मावशीच्या घरी आले. आर्याचे बाबा व ते एकमेकांना चांगले ओळखत होते म्हणून छान गप्पा मारत होते. गप्पा मारता मारता आर्याच्या बाबांनी स्वप्नीलच्या स्वातीवरील प्रेमाविषयी सांगितले. 

स्वातीच्या मावशीचे मिस्टर प्रगत विचारांचे होते त्यामुळे त्यांनी सकारात्मक बाजूने विचार केला व स्वातीच्या आईवडिलांशी बोलून ठरवू असे सांगितले. 

नेमकी स्वातीही तिथे आलेली होती. तिलाही त्यांनी स्पष्ट काय आहे ते सांगायला सांगितले.


"माझेही स्वप्नीलवर प्रेम आहे ..पण तुम्हांला व आईबाबांना जर हे मान्य नसेल तर मी ..तुम्ही म्हणालं तसेचं करणार" 


स्वाती अगदी रडवेल्या आवाजात सांगत होती.


स्वातीच्या डोळ्यातील अश्रू,स्वप्नीलच्या चेहऱ्यावरील खरेपणा सर्वांच्या लक्षात आला होता.हे पळून जाऊन पण लग्न करू शकत होते पण त्यांनी आपल्या घरात सांगितले.  

आणि स्वप्नीलच्या वागण्याबोलण्यातून त्याचे गुण,त्याचे संस्कार सर्व काही स्पष्ट दिसत होते.

या सर्व गोष्टीचा विचार करून स्वातीच्या मावशीच्या मिस्टरांनी तिच्या आईबाबांना व्यवस्थितपणे समजावून सांगितले आणि स्वाती व स्वप्नीलच्या प्रेमाला परवानगी देण्यास सांगितले.

समाज काय म्हणेल या भीतीपेक्षा आपल्या मुलीच्या सुखाचा विचार करून त्यांनीही प्रेमाला मान्यता दिली.


स्वातीला एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीला लागली. तिने आपल्या आईबाबांनी पाहिलेले स्वप्न खरे करून दाखवले. तिच्या आईबाबांना मनापासून आनंद झाला.

स्वप्नीलला ही एका कंपनीत नोकरी मिळाली. त्याच्या घरातही आनंदी आनंदच होता.


"स्वाती मॅडम, तुम्ही दिलेली परीक्षा मी तर पास झालो आता याबदल्यात तुम्ही काय देणार बक्षीस मला ? " 

स्वप्नील प्रेम भरल्या डोळ्यांनी स्वातीला विचारत होता.


"तुझ्या प्रेमाचा मी मनापासून स्विकार केला आहेस,माझेही तुझ्यावर खूप खूप प्रेम आहेस...I love You Too Swapnil  आपल्या प्रेमाची तू ही परीक्षा देत होतास मी ही देत होतेच की? आता या परिक्षेचा निकाल म्हणजे आयुष्यभरासाठी प्रेमाची,विश्वासाची एकमेकांना   सोबत!" स्वातीनेही प्रेम भरल्या नजरेने  स्वप्नीलच्या  प्रश्नाला उत्तर दिले.

दोघानांही मनापासून खूप खूप  आनंद होत होता. 



समाप्त


नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...