मराठी कथा, लेख

शनिवार, २० एप्रिल, २०२४

चूक कोणाची भाग 4


नवरीच्या रूपात सायलीला पाहून  सचिनच्या मनाला खूप त्रास होत होता.जिच्यासोबत लग्नाची,संसाराची स्वप्ने पाहिली होती. ती आज दुसऱ्या कोणाची पत्नी होते आहे.सायली तर खूप आनंदी दिसते आहे ..तिला मनासारखा नवरा मिळाला म्हणून. पण मी माझ्या मनाला कसे समजवू? 


सचिन सायलीच्या लग्नात आनंदी राहण्याचे नाटक करत होता;पण त्याचे मन दुःखी होते.


'मला सायली आवडते. हे आईला कळत होते;पण सायली व तिच्या आईबाबांनी घेतलेल्या निर्णयामुळे आईला माझ्यासाठी  काही करता आले नाही. सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात. कधी त्या इतरांवरही अवलंबून असतात. हा विचार करून आईने स्वतः ही सत्य परिस्थिती स्विकारली होती आणि मलाही स्विकारायला लावली होती.म्हणून तर मी एक स्वप्न समजून सर्व विसरून सायलीच्या लग्नाला आलो.'


दुःखी सचिन आपल्या मनाला समजावत होता.



सायलीचे लग्न छान पार पडले  आणि सायली खूप खूश होती. यामुळे सायलीचे आईबाबा आनंदी,समाधानी होते.


मनातून नाराज असले तरी मंगल व सचिन हे ही सायलीच्या लग्नाला आले होते. 


दुःखी मनाला सावरण्यासाठी वेळ हे चांगले औषध असते.


सचिन आपल्या कामात लक्ष घालू लागला. त्याच्यासाठीही मुली बघायला सुरूवात केली. 

लग्न झाले की, सचिन मागचे सर्व विसरून संसाराला लागेल. असा विचार मंगल करू लागली.


आता सर्व व्यवस्थित सुरू असताना ..सचिनने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला ? म्हणजे तो अजूनही ते दुःख विसरला नाही का? 

त्याच्या या दुःखाला कोण जबाबदार? 


घरातील आम्ही ..ज्यांनी सचिन व सायली च्या लग्नाची स्वप्ने पाहिली?


सचिन स्वतः ...ज्याने सायलीवर मनापासून प्रेम केले आणि ती मिळाली नाही म्हणून आत्महत्या करावी ? 

सायली..जिने सचिनच्या प्रेमाचा,आमच्या सर्वांच्या इच्छेचा विचार न करता फक्त आपल्या स्वतः चा विचार केला. जर तिचे आणि सचिनचे लग्न झाले असते तर...आज सचिन ने असे केले असते का? 


मंगल या विचारात असताना तिला सचिनच्या मित्राने आवाज दिला.


"मावशी, सचिन शुद्धीत आला आहे. त्याला भेटू शकता. असे डॉक्टरांनी सांगितले आहे."


आपला सचिन सुखरूप आहे. हे सचिनकडे पाहून मंगलला रडू येत होते. आनंद तर होताच पण काही बरेवाईट झाले असते तर..या विचाराने जास्त रडू येत होते. दोन वर्षांपूर्वीच कोरोनामुळे 

नवऱ्याला  गमावले होते. आता सचिनचे काही झाले असते तर ..नुसत्या विचारानेच तिच्या मनात धडकी भरली होती.


क्रमशः 

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...