मराठी कथा, लेख

मंगळवार, ३१ मार्च, २०२६

माहेरची जबाबदारी 2

 

 आई अशी का वागत होती.  यामागेही कारण होते. आई जेव्हा जुन्या आठवणी सांगायची, तेव्हा तिच्या बोलण्यातून  कळले की तिला सख्खी सासू नव्हती पण चुलत सासूबाई होत्या. एकत्र कुटुंब होते. आईला सासूबाई खूप त्रास देत होत्या. आईला माहेरी पाठवायच्या नाहीत. आईच्या माहेरचे कोणी भेटायला आले तर घरात भांडण होत होते. 

असेच एकदा आईच्या माहेरचे कोणी नातेवाईक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते.  त्यांना आपल्या घरून डबा द्यावा. असे आईला वाटत होते.  त्या गोष्टीवरून सासूबाईंनी खूप वाद घातला; पण आईने  डबा दिलाच. माहेरच्या लोकांसाठी आपण एवढे तरी करू शकतो ना!  असे आईला वाटले.


 आता या गोष्टीला बरीच वर्षे झाली. आता त्या सासूबाईही नाही आहेत. तेव्हा आई सून होती आता सासूबाई झाली आहे. तिच्या सासूबाई तिच्याशी जशा वागत होत्या, अगदी तशीच ती आपल्या सुनांशी वागत नाही.  थोडा बदल झाला आहे; पण सुनांच्या माहेरच्यांविषयी तिची वृत्ती तशीच आहे. मी आणि दादाने तिला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यात काही बदल होत नाही.  आता प्रियाने तिच्या वडिलांना इकडे मुंबईला आणण्याचा विचार केला आहे. आई कशी रिऍक्ट होईल? आणि वहिनी पण जुनी गोष्ट आठवत टोमणे मारतील ते वेगळेच!  प्रियाचे ऐकले नाही तर प्रिया दु:खी होईल आणि तिचे ऐकले तर आईला व वहिनींना काहीतरी बोलायला व वाद करायला संधी मिळेल.  घरात वाद-विवाद होतील. आता काय करावे? हा मोठा प्रश्न आहे.'



 शुभमचा विचारात असलेला व चिंताग्रस्त असलेला चेहरा पाहून प्रिया त्याला म्हणाली.


 "अहो, तुम्ही एवढा नका विचार करू.  मी बोलते आईंशी या विषयावर."


 प्रियाने असे बोलल्यावर शुभमला अजून जास्त टेन्शन आले.


 रात्री जेवणानंतर सासूबाई टीव्ही पाहत होत्या, तेव्हा प्रिया सासुबाईंना म्हणाली.


"आई,  मला तुमच्याशी थोडे बोलायचे आहे."


"बोल ना प्रिया, असे विचारते का?"


 सासूबाई प्रियाला म्हणाल्या.


 "आई, डॉक्टरांनी  माझ्या बाबांचे हार्टचे ऑपरेशन करण्याचे सांगितले आहे. यांची इथे काही डॉक्टरांशी ओळखही आहे. त्यामुळे चांगल्या हॉस्पिटलमध्ये बाबांचे ऑपरेशन करता येईल. भाऊ सगळा खर्च करणार आहे."


 प्रियाने असे सांगितल्यावर सासूबाई म्हणाल्या.


 "आपले एकत्र कुटुंब आहे. आपण एवढे जण  आहोत. इथे त्यांना आराम मिळेल का?  गावाकडे पण होतात ना ऑपरेशन्स?"



क्रमश:

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...