मराठी कथा, लेख

मंगळवार, ३१ मार्च, २०२६

माहेरची जबाबदारी 1

 

 "काय झालं प्रिया? एवढी उदास का आहेस?"

 शुभमने आपल्या पत्नीला काळजीने विचारले.

 शुभमने काळजीने असे विचारताच प्रिया रडू लागली.

 "अगं अशी रडतेस का? काय झाले ते तर सांग."

प्रियाचे रडणे पाहून शुभमने तिला जवळ घेत विचारले.

 प्रियाने रडत रडत शुभमला सांगितले.

"अहो, डॉक्टरांनी माझ्या बाबांचे हार्ट ऑपरेशन करण्याचे सांगितले आहे."

 "काय झाले गं असे अचानक?"

 शुभमने काळजीने विचारले.

 "त्यांना अगोदर थोडा त्रास होत होता. डॉक्टरांनी आवश्यक सर्व टेस्ट केल्या. औषधेही दिली. मला फोनवर दादाने हे सर्व सांगितले होते. आम्हांला वाटले औषधांनी त्यांना बरे वाटेल आणि तुम्ही पण कामाच्या टेंशनमध्ये होतात म्हणून मी तुम्हांला हे सर्व काही सांगितले नाही. पण आता डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचे सांगितले आहे. मला बाबांची खूप काळजी वाटते आहे.

प्रिया काळजीच्या स्वरात म्हणाली.

"अगं, तू रडू नको. काही काळजीही करू नको. बाबा होतील लवकर बरे."

शुभम प्रियाला धीर देत म्हणाला.

 शुभमने दिलेल्या धीराच्या शब्दांनी प्रियाला बरे वाटले आणि ती त्याला म्हणाली,

 "मी काय म्हणते, आपण इकडे आणायचे का बाबांना  मुंबईला? तुम्ही पण मेडिकल फिल्डमध्ये आहेत.  तुमच्या ओळखीत एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये बाबांचे ऑपरेशन करू."


 आपल्या मनातील विचार प्रियाने शुभमला सांगताच, शुभम काही न बोलता शांत राहिला.

शुभमने आपल्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया न दिल्याने प्रिया त्याला म्हणाली.

  "काय झाले? मी जे काही सांगितले त्यावर तुम्ही काहीच प्रतिक्रिया दिली नाही. माझे म्हणणे तुम्हांला पटले नाही का?"


 "अगं, तुझे सर्व म्हणणे बरोबर आहे.  पण घरात आईला व दादाला विचारावे लागेल ना? त्यांचे काय म्हणणे आहे ते ऐकून, मगच निर्णय घेऊ.  आपण दोघांनीच निर्णय घेतला तर त्यांना काय वाटेल?"

 शुभम प्रियाला म्हणाला.

 शुभमने सांगितलेले ऐकून प्रिया नाराज झाली आणि काही प्रतिक्रिया न देता किचनमध्ये काम करण्यास  निघून गेली. 

 आपल्या बोलण्याने प्रिया नाराज झाली आहे.  हे शुभमच्या लक्षात आले आणि तो  भूतकाळातील काही गोष्टी आठवत विचार  करू लागला.


'काही वर्षांपूर्वी जेव्हा माझे लग्न झालेले नव्हते. तेव्हाचा प्रसंग असेल.

वहिनींचा भाऊ आपल्याकडे आला होता. त्याचे मुंबईला काही काम होते आणि तो 4,5 दिवस राहणार होता. 

आपली बहीण मुंबईला राहते म्हणून तो घरी आला. 

तो आल्याने वहिनींना खूप आनंद झाला होता. 

पण त्याच्या येण्याने आईला आनंद झाला नव्हता. 


'येऊन नुसता भेटून गेला असता पण 4,5 दिवस कशाला राहायचे? दुसरीकडे कुठे सोय करायची ना? अगोदरच घरात आपण एवढे सर्व आणि त्यात हा पाहुणा.'

 

आईचे असे बोलणे सुरू होते. आईचे बोलणे ऐकून वहिनींना खूप वाईट वाटले. घरात जास्त वाद नको म्हणून वहिनींनी  त्यांच्या भावाला दुसरीकडे राहण्यास सांगितले. तो कोणाकडे न जाता हॉटेलमध्ये राहिला. आपल्यामुळे कोणाला त्रास नको. असे त्याला वाटले असेल.


क्रमश:

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...