मराठी कथा, लेख

गुरुवार, २५ एप्रिल, २०२४

माझे प्रेम भाग 1


"अगं हर्षा, वर्षा,सोनल  ही मिठाई घ्या आणि तोंड गोड करा आपले."


माधुरी आपल्या जिवलग मैत्रीणींना आनंदाने मिठाई देत म्हणाली.


"मिठाई बद्दल धन्यवाद... पण मिठाई देण्याचे आणि तुझ्या आनंदाचे कारण काय ते समजले तर अजून जास्त आनंद होईल." 


माधुरीच्या मैत्रीणी आनंदाने मिठाई खात तिला म्हणाल्या.


"मी आज खूप आनंदात आहे. माझे स्वप्न पूर्ण झाले. माझे प्रेम मला मिळाले. मी लग्न केले आज..." माधुरीने आनंदाने आणि कौतुकाने आपल्या आनंदाचे कारण  सांगितले.


"लग्न..प्रेम ..स्वप्न हे काय ? "


हर्षा,वर्षा व सोनल तिघांनीही सारखाच प्रश्न माधुरीला विचारला.


प्रश्न विचारताना तिघींच्याही चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते.


"छुपी रूस्तम ..आपल्या जिवलग मैत्रीणींना ना तुझ्या प्रेमाची काही खबर ना काही माहिती...डायरेक्ट लग्नाची मिठाईचं!" 


हर्षा नाटकी रागाने माधुरीला म्हणाली.


"हो ना.. हर्षा बोलते आहे , ते बरोबरच आहे. खरचं माधुरी तू छुपी रूस्तम आहेस."


वर्षा आणि सोनलनेही हर्षाच्या बोलण्याला दुजोरा दिला.


हर्षा,वर्षा व सोनल तिघही आपल्याला राग आल्याचे दाखवत माधुरीला बोलू लागल्या. गंमतीने तिला त्रास देवू लागल्या.


"माझ्या सख्यांनो, तुम्हांला राग येणे साहजिकच आहे. मी तुमचा राग समजू शकते. मी तुम्हांला काहीचं सांगितले नाही, याबद्दल क्षमा मागते...Sorry dears.

पण तुम्हांला हे न सांगण्यामागे माझी मजबूरी होती. मी कोणाला तरी वचन दिले होते की, जोपर्यंत लग्न होत नाही; तोपर्यंत कोणाला काहीही सांगणार नाही."


माधुरी मैत्रीणींची क्षमा मागत म्हणाली.


"आम्हांला खूप राग आला आहे आणि हा राग तेव्हाच जाईल जेव्हा तू आम्हांला लग्नाची छानशी पार्टी देशील.फक्त मिठाईवर नाही चालणार आमचे." हर्षा माधुरीला म्हणाली.


"आणि तू तुझी लव्ह स्टोरी सांगत नाही; तोपर्यंत आम्ही तुझ्याशी बोलणारही नाही."


वर्षानेही असे म्हणत हर्षाच्या म्हणण्याला साथ दिली.


"कोण आहे तो भाग्यवान पुरूष.. ज्याला आमची माधुरी  आवडली! नाव काय? कुठे राहतो? काय करतो? ...."


सोनलही उत्साहाने, आनंदाने खूप सारे प्रश्न विचारून माधुरीला सतावत होती.


"अगं मुलींनो थांबा जरा...किती घाई झाली तुम्हांला? तुम्ही काही विचारले नसते तरी मी स्वतःहून तुम्हांला सर्व सांगणारच आहे." 


माधुरी आपल्या उत्साही मैत्रीणींना म्हणाली.


"मगं सांग ना लवकर ...आम्ही  ऐकण्यासाठी किती उत्सुक झालो आहोत." 


माधुरी पुढे काही बोलणार एवढ्यात सोनल  तिला म्हणाली.


"तुमच्या सर्वांची उत्सुकता जास्त न लांबवता मी माझी लव्हस्टोरी सांगते आहे." 


माधुरी मोठ्या आनंदाने आपली लव्हस्टोरी मैत्रीणींना सांगू लागली.



क्रमशः

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...