"आय लव्ह यू सविता, तू मला खूप आवडतेस..माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे." असे जेव्हा तो माझ्यासमोर येऊन म्हणाला,तेव्हा मी खूप घाबरली होती.भीतीने अंग थरथरत होते.तोंडातून एक शब्दही निघत नव्हता. त्याला काही उत्तर न देताच..मी घरी पळाली होती.
त्याला मी आवडत होते.हे त्याच्या नजरेतून मला कळत होते आणि माझे मन तर प्रथम भेटीतच त्याच्या प्रेमात पडले होते. त्याच्याकडे सारख पाहत रहाव,त्याच्याशी बोलावं.असेच माझ्या मनाला वाटत असायचे.'तू मला आवडतोस..माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.' हे त्याला सांगावे.असे अनेकदा मनात यायचे;पण हे सर्व त्याला सांगण्याची माझ्यात कधी हिंमत आली नाही. त्याने स्वतः हून प्रपोझ केल्यावरही मी त्याला माझ्या मनातील काही बोलली नाही. कारण घरातल्या ज्या वातावरणात मी वाढले होते;तेथे माझ्या प्रेमाला,माझ्या विचारांना,माझ्या भावनांना काही महत्त्व नव्हते.
पूर्वीपासून चालत आलेली आपली पुरूषप्रधान संस्कृती. घरातील सर्व निर्णय वडीलधाऱ्या पुरूषमंडळीकडेच! स्त्रियांनी फक्त कधी मूल्यांच्या तर कधी नात्यांच्या चौकटीत राहूनच आपली कामे करत रहावी. 'तू एक स्त्री म्हणून जन्माला आली आहेस त्यामुळे तुला स्वतः हून अनेक गोष्टींची बंधने लावून घ्यायची आहेत आणि यातच तुझे भले आहे.' असे आम्हा मुलींना सांगितले जायचे.
साहजिकच घरातील विचारांचा माझ्या मनावर खोलवर परिणाम होत होता.मी माझ्या प्रेमाला,विचारांना, भावनांना महत्त्व न देता...आईवडिलांची मुलगी,भावाबहिणीची एक बहिण आणि एक स्त्री म्हणून माझ्यावर जी बंधने होती...ती सांभाळली..स्विकारली.
माहेरी आईवडिलांची मुलगी,भावाबहिणीची बहिण हे नाते तर जोपासले,सांभाळले पण रूढी,परंपरा या बंधनाबरोबर बंधन नात्यातलेही सांभाळले.आणि लग्नानंतर सासरी एक पत्नी म्हणून,एक सून म्हणून नव्या बंधनात अडकले.
पैसा,माणसे,घरदार ,मुलगा इ..हे सर्व पाहून आईवडील मुलीचे लग्न लावून देतात.पण मुलीला योग्य जोडीदार मिळाला का? हा विचार करतात का? सासरी सर्व गोष्टींचे सुख राहते पण जोडीदार जर आपल्या विचारांच्या,स्वभावाच्या विरोधी मताचा असेल तर ..संसारात आनंद कमी , दुःखच जास्त असते.इतर सुख कितीही असली तरी स्त्रिला स्वतःचे मन मारून संसार करावाच लागतो. जोडीदाराबरोबर नाही पटत म्हणून माहेरी येऊन राहणे,घटस्फोट घेणे यात पुन्हा आपल्या माहेरच्यांना काही टेंशन नको. हा ही विचार ती करत असते.
सासरी सून म्हणून, पत्नी म्हणून नाते सांभाळत नंतर मुलांच्या आईचीही भूमिका पार पाडत असते.
माझेही तेच झाले.
क्रमशः
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.