मराठी कथा, लेख

गुरुवार, २५ एप्रिल, २०२४

माझे प्रेम अंतिम भाग

 


तुम्हांला हे सर्व मी अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला;पण त्याला मी वचन दिले होते ना.. कोणाला काहीही न सांगण्याचे.आमच्या दोघांच्याही घरातून आमच्या प्रेमाला विरोध होईल हे आम्हांला माहित होते;त्यामुळे च कोणाला काहीही  कळू न देण्याची आम्ही काळजी घेत होतो.

आपल्याला प्रेमप्रकरणांच्या अशा अनेक गोष्टी,घटना ऐकायला मिळतात, ज्यात मुलींची फसवणूक होत असते.त्यांचा गैरफायदा घेतला जातो.मुली पटकन कोणावरही विश्वास ठेवतात आणि मग त्याचे गंभीर परिणाम होत असतात. त्यामुळेच आईवडील आपल्या मुलींची काळजी घेत असतात.आणि लोक काय म्हणतील?ही एक भीतीही मनात असते.

 मलाही वाटायचे की, आपण एकप्रकारे आपल्या आईवडिलांना फसवत आहोत. त्यांचा आपल्यावर विश्वास आहे;त्यास आपण पात्र आहोत का?


पण माझा भूषण खूप चांगला आहे. तो मला कधी फसवणार नाही. असे माझे मन मला नेहमी  सांगायचे.नाते टिकवण्यासाठी आपल्या प्रेमावरचा विश्वास महत्त्वाचा असतो. माझा भूषणवर आणि माझ्या प्रेमावर विश्वास होता आणि आहे त्यामुळेच तर मी लग्न करण्याची रिस्क घेतली.आम्ही अगोदरच आमचे प्रेम घरात सांगितले असते तर कदाचित लग्नाला परवानगी मिळाली नसती.आणि माझे M.Sc. पूर्ण होताच माझे आईबाबा माझ्यासाठी मुलगा शोधणार होते. त्यामुळे माझे शिक्षण पूर्ण होण्याअगोदरच आम्हांला लग्न करणे आवश्यक होते.भूषणचेही इंजिनिअरिंग पूर्ण झाले आणि त्याला चांगली नोकरीही मिळाली.माझी परीक्षा संपल्यावर मी घरी गेल्यानंतर घरात आमच्या लग्नाबद्दल सांगणार आहे. भूषणही त्याच्या घरी सांगणार आहे.आईबाबांनी आम्हांला आशीर्वाद देऊन स्विकारले तर चांगलेच! आणि त्यांना आवडले नाही, विरोध केला तर आम्ही दुसरी व्यवस्था केलीच आहे.भूषणने त्याच्या एकदोन विश्वासातील मित्रांना आमच्या प्रेमाविषयी सांगितले होते. त्यांच्या मदतीनेच आम्हांला लग्न करणे सोपे झाले. त्यांनी आमच्यासाठी घर व इतर गोष्टींचीही व्यवस्था केली आहे. 

आम्हांला असे लग्न करून आमच्या आईवडिलांना दुखवायचे नव्हते; पण त्यांचे स्वभाव वगैरे लक्षात घेता ..आम्हांला लग्न करूनच त्यांना सांगणे योग्य वाटले.भूषण दिसायला छान आहे.हुशार आहे.त्याला चांगली नोकरीही मिळाली आहे.स्वभावाने तर खूपच चांगला आहे.आपण लग्न जमवताना हेचं तर पाहत असतो. आम्ही घरातल्यांना न सांगता लग्न केले एवढेचं!."


माधुरीची लव्हस्टोरी ऐकून तिच्या मैत्रीणींना आनंद झाला आणि यापुढे सर्व काही चांगले होईल असा तिला विश्वासही दिला. 



माधुरी व भूषणने ठरल्याप्रमाणे घरात आपले प्रेम,लग्न याविषयी सांगितले. आणि मनात जी भीती होती..तसेच झाले. दोघांच्याही घरात त्यांचा स्विकार झाला नाही. जुन्या परंपरागत परंपरा आणि समाजाच्या भीतीने किंवा एवढा मोठा निर्णय घेताना आपल्याला विचारतही घेतले नाही. असे त्यांना वाटले असेल.


अगोदरच दुसरा पर्याय करून ठेवला असल्याने माधुरी व भूषण दुसरीकडे राहण्यास गेले. 

पुढे सर्व काही व्यवस्थित होईल या आशेवर ते आपला संसार करत होते. 


 जखम ओली असली तर जास्त त्रास होतो.पण हळूहळू ती सुकू लागते आणि आपल्यालाही बरे वाटू लागते. 


तसेच नात्यांचेही होत असते.आपल्या मुलांनी परस्पर लग्न करून आपल्याला दुखवले आहे. असे वाटणाऱ्या आईबाबांना आपल्या मुलांची आठवण येऊ लागते. मुलांनाही आईबाबांची आठवण येऊ लागते.


जे होऊन गेले त्याचा विचार करण्यापेक्षा पुढे जर चांगले होणार असेल तर..या विचाराने आईबाबा आपल्या मुलांना माफ करतात आणि मुलेही आपल्या आईबाबांची क्षमा मागून पुन्हा आपल्या आईबाबांकडे राहण्यास येतात.



भूषणच्या आईबाबांनी तर एकदोन महिन्यातच त्यांना घरी राहण्यास बोलावले.माधुरीच्या आईबाबांना थोडा वेळ लागला ; पण त्यांनाही भूषण जावई म्हणून आवडला.

माधुरीचा व भूषणचा एकमेकांवर विश्वास तर होताच; पण आपल्या प्रेमावर असलेल्या विश्वासामुळे त्यांचे प्रेम यशस्वी झाले. 


माधुरीने जेव्हा हर्षा, वर्षा,सोनल यांना 'माझे प्रेम यशस्वी झाले आणि मी खूप आनंदात आहे.' असे फोनवर सांगितले तेव्हा त्यांनाही खूप आनंद झाला.



समाप्त

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...